भुसावळ शहरातील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये गणरायाची विधीवत स्थापना


भुसावळ : शहरातील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये गणेश चतुर्थीनिमित्त मंगळवार, 19 रोजी विघ्नहर्त्या गणरायाची मोठ्या भक्तीभावाने विधीत स्थापना करण्यात आली.

विद्यार्थ्यांनी केले जल्लोषात स्वागत
सजवलेल्या वाहनावर ढोल-ताशांच्या गजरात व झांज, लेझीम पथकासह वाजत-गाजत गणेश मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. महापूजेचे आयोजन करण्यात आले. संस्थाध्यक्ष मनोज बियाणी व सचिव डॉ.संगीता बियाणी यांच्याहस्ते महापूजा करून गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. यात शाळेच्या संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी विविध आरती सादर केल्या. संस्थेचे उपाध्यक्ष विनोद बियाणी, कार्यकारी संचालिका स्मिता बियाणी, रोनक बियाणी, आयुषी बियाणी, डॉ.मुस्कान बियाणी, राजीव पारीख, प्रवीण भराडिया तसेच बियाणी मिलिटरी स्कूल व बियाणी अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व शाळेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !