रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या : पश्चिम बंगालमधील कुर्मी आंदोलनामुळे नऊ रेल्वे गाड्या रद्द
भुसावळ : दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये कुर्मी आंदोलनाची दखल घेत रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागातून पश्चिम बंगालकडे धावणार्या नऊ रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. ऐनवेळी रद्द गाड्यांमुळे ऐन सणासुदीत प्रवाशांना मोठा मनस्ताप सोसावा लागला. मंगळवार, 19 रोजी सुटणार्या रेल्वे गाड्या प्रशासनाने रद्द केल्या आहेत.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
पश्चिम बंगालमध्ये होणार्या कुर्मी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. रद्द गाड्यांमध्ये एलटीटी-शालिमार एक्स्प्रेस, पुणे-हावडा एक्स्प्रेस, मुंबई-हावडा दुरांतो एक्स्प्रेस, मुंबई-हावडा (12809) मुंबई-हावडा (12859) याच सोबत एलटीटी-कामाख्या एक्स्प्रेस, एलटीटी-शालिमार एक्स्प्रेस तसेच संकरेल सीएसएमटी पार्सल एक्स्प्रेस व मुंबई संकरेल पार्सल एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
