खारदुंगला मॅरेथॉनमध्ये भुसावळचे रनर्सचे तिघे धावपटू चमकले

डॉ.तुषार पाटील यांनी 13 तास 2 मिनिटांत केले 72 तासांचे अंतर पूर्ण


Three runners from Bhusawal runners shone in the Khardungala Marathon भुसावळ : भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनचे डॉ.तुषार पाटील व विजय फिरके यांनी खारदुंगलासारख्या जगातील उंच ठिकाणच्या रस्त्यावर हाडे गोठवणार्‍या थंडीत मॅरेथॉन स्पर्धेत यश मिळवले तर डॉ.चारुलता पाटील या पहिल्या हाफ मॅरेथॉनर ठरल्या. डॉ.तुषार पाटील यांनी 13 तास 2 मिनिटात तर विजय फिरके यांनी 13 तास 27 मिनिटात 72 किलोमिटरचे अंतर गाठले.

भुसावळ रनर्सचा सर्वदूर डंका
भारतातील अत्यंत दुर्गम अशा लडाख जिल्ह्यातील तरुणांना, महिलांना मॅरेथॉनसारख्या साहसी खेळाची ओळख व्हावी, त्यांच्यातील नैसर्गिक गुणांना योग्य वाव मिळावा म्हणून चेवांग मोटूप गोबा यांनी सुरू केलेल्या उपक्रमाचे हे सातवे वर्ष होते. 122 किमी, 72 किमीचे खारदुंगला चॅलेंज, 42 किमीची पूर्ण मॅरेथॉन, 21 किमीची अर्ध मॅरेथॉन किंवा 7 किमीची शाळकरी मुलांसाठीची फन रन यापैकी कोणत्याही विभागामध्ये भाग घेणार्‍या धावपटूला आपल्या स्वतःच्या शारीरिक सामर्थ्याचा कस लावून ठरलेले लक्ष्य गाठताना आनंद गगनात मावेनासा न झाला तरच नवल. 8-10 किमीची चढ वा उताराची चाल. ह्या निसर्गभ्रमणात सुमारे 16000 फुटांवरील ‘शँग-ला’ ही खिंडही धावपटूंनी पूर्ण केली. यशस्वी धावपटूंचे भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनच्या सर्व धावपटूंतर्फे अभिनंदन केले

मॅरेथॉनचे उत्कृष्ठ नियोजन
उत्कृष्ट आयोजनासाठी देखील ही मॅरेथॉन संस्मरनीय ठरली कारण वाटेत ठिकठिकाणी मार्गदर्शक फलक, दर सुमारे 3 किमीनंतर पाण्याचे ठिकाण, इतर पोषक पेये, केळी, इत्यादींची चोख व्यवस्था होती. वाटेतील गावकरी, शाळकरी मुले, सैन्यदलाचे जवान आदी अनेक व्यक्ती आनंदाने टाळ्या वाजवत धावपटूंचा उत्साह वाढवत होते, त्यांना काही हवे, नको ते पाहत होते. आयोजकांचेही सर्व धावपटूंवर लक्ष्य होते व आवश्यक ती वैद्यकीय मदतही पुरवण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !