सावदा जैन मंदिरात दशलक्षण पर्वानिमित्त पूजा व अभिषेक
Pooja and Abhishekam on the occasion of Millionan Parva at Savada Jain Temple सावदा : शहरातील काजीपुरा परीसरातील 1008 चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर व सहस्त्रकूट जीनालयात भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून दशलक्षण पर्वाला सुरुवात झाली. मंगळवारी सकाळी भगवंताचे पंचामृत अभिषेक व पूजन करण्यात आले. सकाळी ध्वजारोहण तर बुधवारी पंच मेरू स्थापना करण्यात आली.
धार्मिक कार्यक्रमांना उपस्थितीचे आवाहन
शनिवारी सकाळी 10 वाजता ऋषी मंडळ पूजन, रविवारी सकाळी 10 वाजता पंचमेरू पूजन, सुगंधी दशमीव्रत पूजन, सोमवारी सकाळी 10 वाजता सम्मेद शिखरजी पूजन, मंगळवारी सकाळी देवी पद्मावती पूजन, बुधवारी रत्नत्रय पूजन, गुरुवारी सकाळी 10 वाजता वासू पूज्य भगवंताची पालखीतून जलयात्रा व सायंकाळी आठ वाजता सामूहिक प्रतिक्रमण, शुक्रवारी सकाळी 10 वाजता पुण्याह वाचन, यज्ञोपवित धारण, दुपारी क्षेत्रपालजी पूजन, रात्री 8 वाजता सामूहिक क्षमावली असा दहा दिवसीय कार्यक्रम होईल. या कार्यक्रमासाठी प्रकाश पांडव, मोहन दहिकर यांच्यासह समस्त समाज बांधवांचे सहकार्य लाभले. सर्व जैन धर्मीय बांधवांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन अध्यक्ष डॉ.दीपक सैतवाल, उपाध्यक्ष देवेंद्र अन्नदाते, सचिव विमलेश जैन, ट्रस्टी योगेश जैन, अभिजित मिटकर यांनी केले आहे.
