पर्यावरण जागर प्रतिष्ठान व हरीत शहर स्वच्छ शहराच्या वतीने वृक्षारोपण


भुसावळ : पर्यावरण जागर प्रतिष्ठान महाराष्ट्र व हरीत शहर स्वच्छ शहर भुसावळ शहराच्या संकल्पनेनुसार 16 व 17 सप्टेंबर या दोन दिवसात जामनेर रोडवरील महालक्ष्मी हार्डवेअरपासून ते महादेव मंदिर दिगंबरनगर ते हिरानगर परिसर या परीरसरात कॉलनीतील रस्त्यांच्या एका बाजूने परीसरातील नागरीकांच्या सहकार्याने वृक्षारोपण करण्यात आले व ट्री गार्डही लावण्यात आल्या.

जागर प्रतिष्ठानचे संचालक संचालक सुरेंद्रसिंग पाटील व कार्याध्यक्ष तथा हरीत शहर स्वच्छ शहर संकल्पना राबविणारे नाना पाटील यांनी परीसरातील नागरीकांना वृक्ष संवर्धन करण्याची जबाबदारी घेणार असाल तरच आपल्या परीसरात वृक्षारोपणासह ट्री गार्ड लावण्याची ग्वाही दिल्यानंतर 55 वृक्ष ट्री गार्ड लावण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !