महापुरुषांना अपेक्षित ‘एक दुर्वा समर्पण’ उपक्रम
उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे : अंतर्नादने दिला 67 विद्यार्थ्यांना मदतीचा हात
भुसावळ : सण-उत्सवांना सामाजिक उपक्रमांची जोड देउन राबविण्यात आलेला हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आणि समाजाला दिशा देणारा असाच आहे.लोकमान्य टिळकांना आणि महापुरुषांना अपेक्षित गणेशोत्सव खर्या अर्थाने हाच आहे. दात्यांच्या मदतीच्या माध्यमातून गरीब, गरजवंत विद्यार्थी यांची शैक्षणिक साहित्याची गरज भागत आहे. समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत ही मदत पोहोचत आहे. भविष्यात यांच्यातूनही कुणी मोठा अधिकारी घडेल आणि या उपक्रमाच्या दातृत्वाचा वारकरी होईल. भविष्यात अंतर्नाद सोबत जुळून सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून समाजासाठी काही करता आल तर ते करण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी केले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
शहरात सालाबादाप्रमाणे अंतर्नाद प्रतिष्ठानने गणरायाला एक दुर्वा समर्पणाची उपक्रम प्रतिभा पाटील प्राथमिक विद्यामंदीर, कंडारी शाळेत राबविला. त्याप्रसंगी ते बोलत होते. विद्यार्थ्यांशी हसत खेळात संवाद साधत प्रश्न उत्तरच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना बोलत केले. विद्यार्थ्यांना समजेल अश्या भाषेत त्यांना मार्गदर्शन केले. बरोबर उत्तर देणार्या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून त्यांनी पेनही दिले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्रातील पहिली ट्रान्सजेंडर महिला पोलीस चांद तडवी, कंडारीचे सरपंच दीपक तायडे, विश्वस्त राकेश कुलकर्णी, मुख्यध्यापिका स्वाती कुलकर्णी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख विक्रांत चौधरी यांनी तर आभार प्रकल्प समन्वयक अमित चौधरी यांनी मानले. संस्थेचा परीचय प्रकल्पासह समन्वयक ललित महाजन यांनी तर सूत्रसंचालन देव सरकटे यांनी केले.

67 विद्यार्थ्यांना मदतीचा हात
यंदा उपक्रमाचे सातवे वर्ष होते. 67 विद्यार्थ्यांना मदतीचा हात या उपक्रमातून देण्यात आला. गणेशोत्सवाच्या खर्चात बचत करीत दात्यांनी स्वेच्छेने दिलेल्या मदतीतुन गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप प्रसंगी करण्यात आले. दरवर्षी पाच शाळा या उपक्रमा अंतर्गत निवडल्या जातात, त्यातील पहिल्या शाळेत हा उपक्रम यावर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी राबविण्यात आला. त्यात बालमित्र पुस्तक, पाटी, पेन्सील, वह्या, पेन, रंगपेटी, पट्टी, खोडरबर ह्या साहित्याचा समावेश होता.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
या प्रसंगी ग.स.कर्ज समिती अध्यक्ष योगेश इंगळे, प्रदीप सोनवणे, प्रसन्न बोरोले, अमितकुमार पाटील, जीवन महाजन, कुंदन वायकोळे, ज्ञानेश्वर घुले, राहुल भारंबे, तेजेंद्र महाजन, समाधान जाधव, अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील, आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

