किनगाव येथे वंचित बहुजन महिला आघाडी शाखेचे उद्घाटन


यावल : यावल तालुक्यातील किनगाव येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या शाखेचे उद्घाटन तसेच नामफलक अनावरण बुधवारी जिल्हा प्रभारी रविकांत वाघ, जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना सोनवणे यांच्याहस्ते करण्यात आले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
यावल तालुका अध्यक्ष भगवान मेघे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष प्रतिभा कोळी यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील विविध गावात शाखा स्थापनेसह गावात नामफलक अनावरण कार्यक्रम झाला. यावल तालुक्याच्या वंचितच्या इतिहासात पहिल्या टप्यात प्रथमच तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गाव तेथे शाखा उघडली जात आहे. शाखा उद्घाटनप्रसंगी वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा मीरा वानखेडे, जिल्हा संघटक राजेंद्र बारी, छाया हिरोळे, संतोष तायडे, भूषण साळुंके, मेजर देवदत्त मकासरे, धीरज मेघे, किनगाव शहर अध्यक्षा मंगला सुनील कोळी, शहर उपाध्यक्षा मनीषा शरद अडकमोल, शाखाध्यक्षा सबेरा गफुर तडवी, शाखा सचिव संध्या दत्तू भालेराव, शाखा कार्याध्यक्ष भारती संजय अडकमोल, शाखा सदस्य सपना नाना साळुंके, लता रघुनाथ बाविस्कर, यमुनाबाई युवराज भालेराव, सुशिलाबाई उत्तम भालेराव, माधुरी विनोद मेढे, रेखा रवींद्र अडकमोल, ताराबाई शामराव तायडे, मंडाबाई बापू सपकाळे, जनाबाई श्रावण सोनवणे, कल्पना मनोहर अडकमोल, रमाबाई राजू अडकमोल, पूजा संजय सोनवणे, शिंधुबाई दामू साळुंके, शीतल चेतन भालेराव, तेजल सुनील सोनवणे, हसीनाबाई गफूर तडवी, कल्पना शिधार्थ भालेराव, साधना गौतम निकम, ललिता राजू निकम, फरीदाबाई खाटीक, दिलीप सोनवणे, रोहन निकम, भूषण भालेराव, बाबूलाल पटेल, भानुदास महाजन व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन संतोष तायडे यांनी तर व आभार भूषण साळुंके यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !