वरणगावातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग : तरुणाला अटक


Molestation of a minor girl in Warangaon : Youth arrested भुसावळ : भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील अल्पवयीन मुलीचा रस्ता अडवत तिचा विनयभंग करण्यात आला तसेच पीडीतेला शिविगाळ करण्यात आल्याचा प्रकार गुरुवार, 21 रोजी दुपारी एक वाजता घडला. याप्रकरणी संशयित निलेश राखुंडे विरोधात गुन्हा दाखल होताच त्यास अटक करण्यात आली.

विनयभंगप्रकरणी तरुणाला अटक
शहरातील एका भागातील अल्पवयीन मुलगी हायस्कूलमध्ये शिक्षण घेते. शाळेतील जाण्या-येण्याच्या माार्गवर संशयित निलेश राखुंडे हा गेल्या काही दिवसांपासून मुलीचा पाठलाग करीत होता व 21 रोजी दुपारी एक वाजता आरोपीने मुलीचा रस्ता अडवत तिला प्रेम करण्यासाठी गळ घातला. मुलीने नकार देताच आरोपीने मुलीला शिविगाळ केली. मुलीने हा प्रकार कुटूंबियांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली. मुलीच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात पोस्कोअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार मधुकर भालशंकर करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !