भुसावळातील आठवडे बाजारातून दुचाकी लांबवली
भुसावळ : शहरात दुचाकी चोरीचे सत्र कायम असून वर्दळीच्या आठवडे बाजार परीसरातून मजूराची अज्ञातांनी दुचाकी लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
रवी रामचंद्र राऊत (31, संस्कृती नगर, रेल्वे गेटजवळ, फेकरी, ता.भुसावळ) हे कामानिमित्त शहरात आल्यानंतर त्यांनी आठवडे बाजारात दुचाकी पार्क केली होती मात्र चोरट्यांनी संधी साधून दुचाकी लंपास केली. सर्वत्र शोध घेवूनही दुचाकीचा तपास न लागल्याने राऊत यांनी बाजारपेठ पोलिसात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार उमाकांत पाटील करीत आहेत.








