भुसावळात सेनेचे अनोखे आंदोलन : खड्ड्यांमध्ये लावले बेशरमीचे झाड

मूलभूत सुविधा सुटण्यासाठी आंदोलन : माठ फोडत अनियमित पाणीपुरवठ्याचा निषेध


Army’s unique movement in Bhusawal : Shameless tree planted in pits भुसावळ : भुसावळ पालिकेचे मूलभूत सुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष झाल्याने पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी शिवसेना उबाठा गटातर्फे शहरातील विविध ठिकाणच्या खड्ड्यांमध्ये कागदी नाव (होड्या) सोडण्यात आल्या तर खड्ड्यांचे पूजन करून त्यात बेशरमीचे झाड लावून पालिका प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला. सेना पदाधिकार्‍यांनी जलशुद्धीकरण केंद्रात अनियमित पुरवठ्याचा निषेध नोंदवत माठही फोडलत पालिका प्रशासनाचा निषेध नोंदवला.

सेनेच्या आंदोलनाने उडाली खळबळ
शिवसेनेच उबाठा गटातर्फे नियोजित आंदोलनाबाबत इशारा देण्यात आला होता. पालिका प्रशासनाकडून रस्ते, पाणी व पथदिव्यांची समस्या सुटत नसल्याने या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शहरातील सहा भागात पदाधिकार्‍यांनी आंदोलन केले. पदाधिकार्‍यांनी शहरातील विविध भागातील खड्ड्यांमध्ये कागदी होड्या सोडल्या व नंतर खड्ड्यांचे पूजन करीत त्यात बेशरमीचे झाड लावून पालिकेचा निषेध नोंदवला तर पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात माठ फोडून निषेध करण्यात आला त्यानंतर पालिकेत पदाधिकार्‍यांनी ठिय्या मांडला. पालिकेने मोर्चेकर्‍यांना डिसेंबरनंतर शहरात शुध्द पाणीपुरवठा होईल तर अमृत योजनेनंतर दररोज पाणी मिळेल, असे लेखी आश्वासन दिले. दरम्यान, प्रत्येक आंदोलनस्थळी पदाधिकार्‍यांनी काळे फुगे सोडत पालिका प्रशासनाचा निषेध नोंदवला. दरम्यान, नागरी प्रश्नांबाबत सोमवारी प्रशासक जितेंद्र पाटील यांच्या दालनात आता बैठक होणार आहे.

यांचा आंदोलनात सहभाग
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन, शहरप्रमुख दीपक धांडे, तालुका संघटक बबलू बर्‍हाटे, माजी नगरसेवक दिलीप सुरवाडे, निलेश महाजन, सोनी ठाकूर, अमजद खान, वरणगावचे शहरप्रमुख संतोष माळी, मनोज पवार, योगेश बागुल, अ‍ॅड.नरेंद्र लोखंडे, हेमंत बर्‍हाटे, स्वप्नील साळवे, राकेश खरारे, अरुण साळुंके आदींसह शेकडो शिवसैनिक व पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !