शिरपूरात वकिलांकडे धाडसी घरफोडी


Daring house burglary at lawyers in Shirpur शिरपूर : घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी तीन लाख 10 हजारांचा ऐवज लांबवल्याची घटना शिरपूरात घडली. शिरपूरच्या सुभाष कॉलनीत अ‍ॅड.रणवीर युगराज शिंगावे (पुणे) वास्तव्यास आहेत. 18 ते 20 सप्टेंबर या कालावधीत शिंगावे परीवार बाहेरगावी गेल्यानंत चोरट्यांनी संधी साधली तर कुटूंब घरी आल्यानंतर घरफोडीचा प्रकार उघड झाला. गुरुवारी सायंकाळी घरफोडीचा गुन्हा शिरपूर शहर पोलिसात दाखल करण्यात आला.

बंद घर चोरट्यांच्या पथ्थ्यावर
घर बंद असल्याने चोरट्यांनी संधी साधली. कडीकोंडा व कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर बेडरुममधील कपाट फोडून त्यातील लॉकर तोडण्यात आले व लॉकरमध्ये ठेवलेले 80 हजार रुपये किंमतीचा सोन्याचा हार, 60 हजार रुपये किंमतीची मंगलपोत, 80 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या, 10 हजारांची रोकड असा एकूण तीन लाख 10 हजारांचा ऐवज चोरट्याने लांबविला.

चोरीची ही घटना 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात ते 20 सप्टेंबर सकाळी 10 वाजेच्या दरम्यान घडली. गुरुवारी सायंकाळी पाच वाजता अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक संदीप दरवडे घटनेचा तपास करीत आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !