भुसावळात रेल्वेच्या पार्किंगमधून दुचाकी लांबवली


The bike was extended from the railway parking lot in Bhusawal भुसावळ : शहरातील रेल्वेच्या पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी चोरट्यांनी लांबवल्याचा प्रकार उघडकीस आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर वाहनधारकांमध्ये खळबळ उडाली.

आता पार्किंगही सुरक्षित नाही
आदिल शहा हबीब शहा (34, जाम मोहल्ला, भुसावळ) यांना कामानिमित्त बाहेर जायचे असल्याने त्यांनी आपली 15 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.20 बी.र्इृ.9338) ही रेल्वेच्या पार्किंगमध्ये लावली होती मात्र चोरट्यांनी अत्यंत सुरक्षीत समजल्या जाणार्‍या पार्किंग एरीयामधून दुचाकी लांबवली. हा प्रकार शुक्रवार, 22 रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडला. शोध घेवूनही दुचाकीचा तपास न लागल्याने शहा यांनी तक्रार दिल्यानंतर बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार यासीन पिंजारी करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !