कुर्हा परीसरात पुराच्या पाण्याने शेतांचे नुकसान : अॅड.रोहिणी खडसे यांनी केली नुकसानीची पाहणी
Damage to fields due to flood water in Kurha Area : Adv.Rohini Khadse inspected the damage मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा परीसरात शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पाऊसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. पुराचे पाणी शेतांमध्ये शिरल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. बोदवड, मोरझिरा, धामणगाव येथे पुराच्या पाणी शेतात शिरल्याने शेतजजमिनीसह पिके वाहिली आहेत. बोदवड येथे बोदवड ते पूर्णा नदी या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यावरील नाल्याचे पाणी नाल्याचा प्रवाह सोडून बाजुच्या शेतात शिरल्याने पिके वाहून गेल्याने शेतकर्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे
रोहिणी खडसेंनी केली पाहणी
मोरझिरा येथे असलेला तलाव तुडुंब भरला असून तलावाच्या सांडव्यातून आणि भिंतीवरुन पाण्याचा विसर्ग होत आहे. पुराचे पाणी शेतात शिरल्याने पिकांचे नुकसान झाले. धामणगाव येथे सुध्दा नाल्याच्या पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेती पिकांचे नुकसान झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष अॅड.रोहिणी खडसे यांनी बोदवड, मोरझिरा, धामणगाव येथे शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली तसेच मुक्ताईनगर तहसीलदार यांच्या सोबत नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत चर्चा केली.

यांची होती उपस्थिती
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांसोबत चर्चा करून बोदवड येथील नाल्यावर उंच मोरी (पुल) बांधण्याची तसेच मोरझिरा तलावाच्या भिंतीची उंची वाढविण्याची मागणी केली. धामणगाव- मधापुरी-चारठाणा रस्त्यावर असलेल्या पूल पुराच्या पाण्याने क्षतीग्रस्त झाला असल्याने वाहतूक बंद झाली आहे क्षतीग्रस्त पुलाची दुरुस्ती करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांसोबत चर्चा करण्यात आली. आमदार एकनाथराव खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे अॅड. रोहिणी खडसे यांनी सांगीतले. यावेळी माजी सभापती निवृत्ती पाटील, दशरथ कांडेलकर, डॉ.बी.सी.महाजन, प्रदीप साळुंखे, विशाल रोटे, नितेश राठोड, जितेंद्र (भैय्या) पाटील, ज्ञानदेव मांडोकार, लहू घुळे, हरलाल राठोड, अशोक मोहिते, अजय बागल, शेतकरी बांधव उपस्थित होते.

