भुसावळात रेल्वे तिकीट निरीक्षकाला किरकोळ कारणातून मारहाण
A railway ticket inspector was assaulted for a minor reason in Bhusawal भुसावळ : रस्त्यात उभे का राहतात? याचा जाब विचारल्याच्या वादातून रेल्वेतील तिकीट निरीक्षकाला शिविगाळ करीत मारहाण करून त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकण्यात आला. ही घटना पंधरा बंगला परीसरातील एलोरा कॉलनीत शुक्रवार, 22 रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
डोक्यात मारला लोखंडी रॉड
विश्वंभर दयालचंद मूलचंद (37, एलोरा कॉलनी, पंधरा बंगला, भुसावळ) हे रेल्वेत टीटीआय आहेत. शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता ते परीचीतांसह रस्त्यात बोलत असताना संशयीत शकील पिंजारी हा रस्त्यावरून जात असताना त्याने मूलचंद यांना रस्त्यात का उभे आहेत? असा जाब विचारल्याने शाब्दीक वाद वाढून हाणामारीपर्यंत पोहोचला. यावेळी शकील पिंजारीसह त्याची आई व बहिण (नाव माहित नाही, भुसावळ) यांनी शिविगाळ करीत मारहाण केली तसे शकील याने लोखंडी रॉड मूलचंद यांच्या डोक्यात मारून दुखापत केली. याप्रकरणी संशयिताविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार जितेंद्र पाटील करीत आहेत.






