माधुरी चौधरी यांच्या ‘बेरकी नाम्या’स राज्यस्तरीय पुरस्कार
Madhuri Chaudhary’s ‘Berki Namya’ State Level Award फैजपूर : फैजपूर शहरातील माहेरवाशीण तथा संभाजीनगर येथील लेखिका, कवयित्री माधुरी (वाघूळदे) चौधरी यांच्या ‘बेरकी नाम्या’ या विनोदी कथासंग्रहास भुसावळातील के.नारखेडे विद्यालयातर्फे बाबासाहेब के.नारखेडे राज्यस्तरीय पुरस्कार समारंभपूर्वक भुसावळ येथील प्रभाकर हॉलमध्ये प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार शिक्षणसम्राट नंदूकुमार बेंडाळे यांच्याहस्ते व संस्थेचे अध्यक्ष मकरंद नारखेडे यांच्या उपस्थितीत देण्यात आला. रोख 2001 रुपये, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष डॉ. मकरंद नारखेडे, डॉ.संजीव नारखेडे, पी.व्ही.पाटील, सदस्य भाग्येश नारखेडे, संस्थेचे सचिव व नगरसेवक प्रमोद नेमाडे, उद्योजक विकास पाचपांडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.बी.किरंगे आदी मान्यवर उपस्थित होते.


