विवाह होत नसल्याने नैराश्यातून डोणगावच्या तरुणाची आत्महत्या
Youth of Dongaon committed suicide due to depression due to non-marriage यावल : यावल तालुक्यातील डोणगाव येथील 37 वर्षीय तरुणाने विवाह होत नसल्याच्या नैराश्यातून राहत्या घरात गळफास घेतला. ही घटना निदर्शनास येताच त्याला तातडीने रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
तरुणाच्या मृत्यूने हळहळ
डोणगाव, ता.यावल येथील बळीराम अरुण पाटील (37) या तरुणाचा विवाह होत नसल्याने तो वैफल्यग्रस्त झाला होता. याच नैराश्यातून त्याने आपल्या राहत्या घराच्या आत सिलिंग फॅनला साडीने गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार असलम खान करीत आहेत.






