विद्यार्थ्यांसाठी बस न थांबवल्याने चितोडा येथे रस्ता रोको आंदोलन


Road stop protest at Chitoda due to non-stopping of buses for students यावल : यावल तालुक्यातील चितोडा येथे विद्यार्थ्यांसाठी बस थांबवली नसल्याने विद्यार्थ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. घटनास्थळी तातडीने पोलीस निरीक्षक व एस.टी.आगारातील वाहतूक नियंत्रक यांनी धाव घेतली व विद्यार्थ्यांची समजूत काढून यापुढे नेहमी तेथे बस थांबतील, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. चितोडा, ता.यावल येथील बस स्थानकावर सकाळी नऊ वाजेपासून गावातील विद्यार्थी यावल येथे येण्याकरीता थांबले होते. दरम्यान, एक तासात येथून तीन एसटी बसेस गेल्या मात्र चालकांनी बस थांबवली नाही म्हणून संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले.

अधिकार्‍यांची धाव
रास्ता रोको आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, यावल एसटी आगाराचे वाहतूक निरीक्षक कुंदन वानखेडे हे पथकासह चितोडा येथे दाखल झाले. त्यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढली. यावल आगारातील तब्बल 16 एस.टी.बसेस गणेशोत्सव निमित्त कोकणात गेल्याने फैजपूर मार्गावरील काही फेर्‍या रद्द आहेत परीणामी ही अडचण निर्माण झाल्याचे सांगितले. चोपडा एस.टी.आगारातील दोन बसेस इथून गेल्या त्या का थांबल्या नाही याबाबत आपण संबंधितांना विचारणा करू व यापुढे नियमित येथे बस थांबतील, असे आश्वासन देण्यात आले व आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !