भुसावळात बंदोबस्तावरील पोलिस कर्मचार्याची दुचाकी लांबवली
भुसावळ : शहरात एकीकडे दुचाकी चोरीचे सत्र सुरू झाल्याने सर्वसामान्य नागरीकांसह वाहनधारक त्रस्त झाले असताना आत चक्क गणेशोत्सव मंडळांच्या बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसाची दुचाकी भामट्यांनी लांबवल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांचे वाहनही सुरक्षीत नाही
शहरातील मातृभूमी चौकात पोलीस कर्मचाीर शब्बीर दगेखा तडवी (53, पोलीस वसाहत, भुसावळ) यांनी 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 ए.एल.3275) पार्क केली असता चोरट्यांनी संधी साधली. ही घटना रविवार, 24 रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सुनील जोशी करीत आहेत.


