बामणोद येथील तरुणीचा घरात घुसून विनयभंग
A girl from Bamanod was molested by breaking into her house यावल : यावल तालुक्यातील बामणोद येथील एका 19 वर्षीय तरुणीचा अनधिकृतपणे एकाने घरात प्रवेश करीत विनयभंग केला. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
संशयिताविरोधात गुन्हा दाखल
बामणोद गावातील संशयीत गोपाळ उत्तम भालेराव याने 19 वर्षीय तरुणीच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करीत तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करीत तरुणीला अश्लील शिवीगाळ केली. पीडीत मुलीच्या आई-वडिलांनादेखील मारहाण करण्यात आली. 19 वर्षीय पीडीत तरुणीने फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर गोपाळ भालेराव यांच्याविरुद्ध विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विकास सोनवणे करीत आहेत.


