सावकाराच्या जाचापुढे टेकले हात ; जैताणेतील शिक्षकाने उचलले टोकाचे पाऊल
Hands bowed before the moneylender; A teacher in Jaitane took an extreme step
धुळे : जैताणे, ता.धुळे येथील शिक्षकाने सावकारीच्या जाचापुढे हात टेकत टोकाचे पाऊल उचलले. आनंदा रतन चव्हाण (वय 33, रा. निजामपूर्) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव असून ते जैताणेतील आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत होते. मंगळवारी घडलेल्या या घटनेप्रकरणी निजामपूर पोलिसात तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
व्याजासाठी सावकारांचा तगादा
आनंदा चव्हाण यांनी जैताणे येथील तीन जणांकडून व्याजाने पैसे घेतलेले होते. खासगी सावकारांना व्याजाचे पैसे देऊनही ते वेळोवेळी आनंदा चव्हाण यांच्याकडे पैशांचा तगादा लावत असल्याने तसेच ज्ञानदानाचे कार्य सुरू असताना शाळेत येवून धमकावत असल्याने चव्हाण हे खचले होते.होते. तसेच शाळेत व घरी येऊन मारण्याची धमकी देत होते. मंगळवारी स्टोअररूममध्ये त्यांनी गळफास घेतला.
एक ताब्यात ; दोघे पसार
धनराज रतन चव्हाण यांनी निजामपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून त्रिकूटाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून दोघे पसार आहेत. आनंदा चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, मुलगी गार्गी (4), आरू (2), आई, वडील असा परिवार आहे. दरम्यान, मृत्यूपूर्वी चव्हाण यांनी चिठ्ठी लिहित कुटूंबाची माफी मागितली असून होणार्या त्रासाचा त्यांनी उल्लेख केला आहे.




