भुसावळातील भोळे महाविद्यालय कबड्डी स्पर्धेत विजयी


भुसावळ : जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत भुसावळ तालुकास्तरीय आंतरशालेय कबड्डी स्पर्धा सोमवार, 25 सप्टेंबर रोजी बियाणी मिलिटरी स्कूलच्या मैदानावर झाल्या. त्यात 19 वर्षा खालील गटात दादासाहेब देविदास नामदेव भोळे ज्युनियर कॉलेज कब्बडी संघाने डी.एस.ज्युनियर कॉलेज, भुसावळ संघाचा 02-25 ने पराभव केला. सेमी फायनलमध्ये महात्मा गांधी ज्युनियर कॉलेज, वरणगाव यांचा 07-44 स्कोर करून 37 गुणांनी पराभव करीत अंतीम सामन्यात प्रवेश केला. अंतीम सामना नाहटाविरुद्ध भोळे कॉलेज यांच्यात झाला. त्यात 12-40 स्कोअर करून 28 गुणांनी विजेतेपद पटकावले.

यशाबद्दल खेळाडूंचा सत्कार
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजू फालक, प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.डॉ.जे.पी.सरोदे, प्रा.डॉ.जे.बी.चव्हाण, प्रा.एस.डी.चौधरी, प्रकाश सावळे, भुसावळ तालुका क्रीडा समन्वयक राजेंद्र कुलकर्णी, बी.एन.पाटील, उपमुख्यरध्यापक रमण भोळे यांनी अभिनंदन केले. या स्पर्धेमध्ये अखिलेश कुट्टरवार, महेश पवार, निशांत वारुळकर, प्रतीक अवसरमल, सद्दाम शेख, भावेश सोनवणे, मंथन वानखेडे, भूषण गुंजाळ, भावेश बडगुजर, यश इंगळे यांनी उत्कृष्ठ कामगिरी केली. संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !