पंतप्रधान तर देशाचे विकासाचे युगपुरुष : महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र रेटिना शिबिर


The prime minister is the man of the country’s development: Mahamandaleshwar Janardhan Hariji फैजपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त यशोदाबाई सराफ चॅरिटेबल ट्रस्ट फैजपूर संस्थाध्यक्ष तथा संस्था संचालक भाजपा जिल्हा संयोजक माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ विद्यमाने त्यांच्या निवासस्थानी विविध जनसेवा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून 27 सप्टेंबर रोजी जळगाव येथील नेत्र रेटिना तज्ञ डॉ.मोहित गणेश भारंबे फैजपूरकर यांच्याहस्ते मधुमेह रेटिना नेत्र शिबिरात 257 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. अत्यावश्यक रुग्णांवर जळगावात अत्यंत अल्प दरात पुढील उपचार करण्यात येणार असल्याचे प्रास्ताविकात सराफ यांनी सांगितले.

पंतप्रधान तर युगपुरूष : महामंडलेश्वर
फैजपूर शहराचे भूमिपुत्र आरोग्य शिबिराच्या माध्यमातून शहरवासीयांना वाजवी दरात वैद्यकीय लाभ घडवून देत असल्याचा अत्यानंद होत आहे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जनसेवा उपक्रम वेळोवेळी राबविण्यात यावे, नरेंद्र मोदी हे विकासाचे युगपुरुष आहेत, असे प्रतिपादन जनार्दन हरिजी यांनी व्यक्तत केले. उद्घाटटन महामंडलेश्वर श्री जनार्दन हरी महाराज, खान्देशरत्न शास्त्री भक्तीकिशोरदासजी कोठारी (सावदा) यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी फैजपूर उपविभागीय अधिकारी कैलास कडलग, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिराभाऊ चौधरी, शरद महाजन, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस राकेश फेगडे, तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, जि.प.चे माजी सभापती रवींद्र पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती पल्लवी चौधरी, सरपंच परीषद जिल्हाध्यक्ष पुरुजीत चौधरी, जि.प.च्या माजी सदस्य सविता भालेराव, माजी नगराध्यक्ष बी.के.चौधरी, माजी नगरसेवक मोहन महाजन, चंद्रशेखर चौधरी, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष अनिरुद्ध सरोदे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सागर कोळी, तालुका उपाध्यक्ष रामा होले, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष जयश्री चौधरी, यावल शहराध्यक्ष डॉ.निलेश गडे, फैजपूर शहराध्यक्ष अनंता नेहेते, कांचन फालक, भारती पाटील, अनुराधा परदेशी, दीपाली झोपे, डॉ.गणेश भारंबे, डॉ.नितीन महाजन, डॉ.उमेश चौधरी, डॉ.गौरव चौधरी, उद्योजक युगंधर पवार, वसंत कापडे, हरचंद वाघूळदे, प्रभूदास महाजन, कृउबा संचालक उमेश पाटील, कांचन फालक, योगीराज ब्रह्मटे, गणेश फालक, सरपंच सतीष चौधरी, किशोर पाटील, किशोर कुलकर्णी, अजय भालेराव, अजय सपकाळे, कल्पेश खत्री, संदीप भारंबे, सिद्धेश्वर वाघूळदे यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन किरण चौधरी तर आभार पप्पू चौधरी यांनी केले. चेतन पाटील, नंदकिशोर अग्रवाल, लोकेश वाघूळदे, चंद्रकांत कोळी, विनोद काकडे आदींनी परीश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !