यावल शहरात मोठ्या उत्साहात ईद मिलादुन्नबी साजरी
Eid Miladunnabi was celebrated with great enthusiasm in Yaval city यावल : शहरात शुक्रवारी मोठ्या उत्साहात ईद मिलादुन्नबीची मिरवणूक काढण्यात आली. शुक्रारी सकाळ दहा वाजेपासून सुदर्शन चौकातून मिरवणुकीला सुरवात झाली. मिरवणुकीत सहभागी मुस्लिम समाज बांधवांना श्री दत्त मंदिराजवळ हिंदू समाज बांधवांकडून जलपानाची व्यवस्था करीत राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडले. मुस्लीम बांधवांच्या वतीने मिरवणुकीच्या मागे स्वच्छता अभियान राबवण्यात आले तर अनेक ठिकाणी मिठाई वाटप करण्यात आली. शहरात शुक्रवारी ईद मिलादुन्नबीची मिरवणूक सुदर्शन चौकातून काढण्यात आली मोठ्या उत्साहात ही मिरवणूक निघाली. हजारोच्या संख्येत मुस्लिम समाज बांधव यात सहभागी झाले होते.
शहरातून ही मिरवणुक सुदर्शन चौकाकडून डांगपुरा व तेथून मेन रोडने नगीना मशिदीकडून बुरूज चौकात आली व चोपडा रस्त्यावरील ख्याजा मस्जिद जवळ मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. शहरातील आयडीबीआय बँकेजवळील श्री दत्त मंदिराजवळ दिलीप वाणी, सारंग बेहेडे, राजेश श्रावगी यांच्या वतीने मुस्लिम बांधवांना जलपानाची व्यवस्था करण्यात आली. त्यातून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडले. अनेक ठिकाणी मुस्लिम बांधवांकडून मिठाई वाटप करण्यात आली व दुपारी एक वाजेला मिरवणुकीचा समारोप झाला. मिरवणुकीत फैजपूरचे डीवायएसपी डॉ.कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, उपनिरीक्षक अविनाश दहिफळे सह कर्मचार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

दहिगाव, ता.यावल
दहिगाव : गावात जश्ने ईद मिलादुन्न नबी उत्सवात व शांततेत पार पडली. यावेळी दहिगाव येथील सरपंच अजय अडकमोल, हाजी मुक्तार पठाण, ग्रामपंचायत सदस्य सत्तार तडवी, जफर पठाण, इरफान पठाण, फारुख पठाण, इम्रान शेख, मासुम शेख, रहमोदिन शेख, जावेद मिस्तरी, शकील मिस्त्री सह आदींची उपस्थिती होती.

