रेल्वे प्रवाशांनो ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची : धुळे-दादर एक्स्प्रेस या तारखेपर्यंत मुदतवाढ


Important news for you railway passengers : Dhule-Dadar Express extended till date भुसावळ : रेल्वे प्रवाशांची अतिरीक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात 02102 मनमाड-दादर त्री-साप्ताहिक विशेष (बुधवार-शुक्रवार-रविवार) गाडीला आता 4 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. 02101 दादर-मनमाड त्री-साप्ताहिक विशेष (मंगळवार-बुधवार-शनिवार) गाडीला आता 4 ऑक्टोबर ते 2 जानेवारी 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

दादर-धुळे एक्स्प्रेसला मुदतवाढ
01065 दादर-धुळे (त्री साप्ताहिक) विशेष (सोमवार-शुक्रवार-रविवार) गाडीला 6 ऑक्टोबर ते 1 जानेवारी 2024 दरम्यान मुदतवाढ देण्यात आली तसेच 01066 धुळे-दादर (त्री-साप्ताहिक) विशेष (सोमवार-मंगळवार-शनिवार) गाडीला 7 ऑक्टोबर ते 2 जानेवारी 2024 दरम्यान मुदतवाढ देण्यात आली. वराील गाड्यांच्या वेळ, संरचना आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही तसेच संगणकीत आरक्षण केंद्रासह संकेतस्थळावर बुकींग सुरू करण्यात आले आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !