निमडाळे एकाच रात्रीतून तीन घरफोड्या : सव्वा पाच लाख लांबवले


Three house burglaries in Nimdale in one night : 500,000 were recovered धुळे : धुळे तालुक्यातील निमडाळे येथे एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोड्या करण्यात आल्या तर शस्त्राचा धाक दाखवून घर मालकाकडील सव्वा पाच लाखांची रोकड घरातून लांबवण्यात आली. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

घर मालकाला जाग येताच लावला चाकू
निमडाळे गावातील साळुंखे गल्लीत काशीनाथ विठ्ठल सूर्यवंशी-पाटील राहतात. रविवारी मध्यरात्री अडीच वाजता त्यांच्या घराच्या मागील दरवाजाने तीन चोरटे आत शिरताच सूर्यवंशी यांना जाग आली. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या मानेला चाकू लावून दहशत निर्माण केली तर शस्त्र हातात असलेल्या चोरट्यांना पाहून सूर्यवंशी घाबरले. तिघांपैकी एक चोरट्याने आम्ही तुम्हाला काहीच करणार नाही म्हणत कपाट्याच्या चाव्या मागितल्या शिवाय चोरट्याने पाणी आणून पाजले. त्यानंतर चोरट्यांनी सूर्यवंशी यांच्या घरातून सुमारे सव्वा पाच लाखांची रोकड लांबवली.

चोरट्यांनी सूर्यवंशी यांच्या घराप्रमाणे भावराव विठ्ठल साळुंके यांच्या घरातही चोरी केली. साळुंखे पुण्याला गेले आहे. त्यामुळे घर बंद होते. तसेच गावातील महादेव मंदिराजवळ राहणारे रवींद्र पाटील यांच्या घरातही चोरी झाली. भटू साळुंके यांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात आले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !