राज्यभरात 70 घरफोडीचे गुन्हे ; धुळ्यातील कुविख्यात घरफोड्या सांगली एलसीबीच्या जाळ्यात


सांगली : राज्यभरात 70 घरफोडीचे गुन्हे ; धुळ्यातील कुविख्यात घरफोड्या सांगली एलसीबीच्या जाळ्यात
राज्यभरात 70 हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या धुळ्यातील कुविख्यात घरफोड्यासह त्याच्या साथीदाराच्या सांगली एलसीबीने मुसक्या आवळल्या आहेत. कैलास चिंतामण मोरे (43) व जयप्रकाश राजाराम यादव (35, रा.सोनगीर, आंबेडकर नगर, धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून 33 तोळे सोन्याचे दागिने, 593 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली कार, रोख रक्कम असा एकूण 23 लाख 71 हजारांचा मुद्देमाल यंत्रणेने जप्त केला.

संशय बळावताच आवळल्या मुसक्या
सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथकास घरफोडीतील दोघे मणेराजुरी (ता. तासगाव)च्या दिशेने जात असल्याची कळताच त्यांनी तासगाव-मणेराजुरी रस्त्यावर सापळा रचला. विना नंबरप्लेटच्या कारमधून संशयित आल्यानंतर पोलिसांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये सोने – चांदीचे दागिने, घरफोडीकरता लागणारे साहित्य, रोख रक्कम असा ऐवज आढळला. चौकशीत दोघांनी घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून विश्रामबाग, मिरज आणि संजयनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेले चार गुन्हे उघडकीस आले.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई पोलिस निरिक्षक सतीश शिंदे, पोलीस अधिकारी पंकज पवार, सिकंदर वर्धन यांच्यासह पोलीस कर्मचारी बिरोबा नरळे, सागर लवटे, अमर नरळे, सागर टिंगरे, विक्रम खोत, अजय पाटील आदींनी केली.

कुविख्यात आरोपींविरोधात राज्यात गुन्हे
कैलास मोरे याच्यावर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये तसेच गुजरातमध्ये एकूण 70 हून अधिक तर जयप्रकाश यादव याच्यावर 21 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !