धुळे तालुक्यातील तिघांचे बळी घेणारा नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद
The man-eating leopard that killed three people in Dhule taluka has finally been jailed धुळे : तब्बल तीन बालकांचे बळी घेतल्यानंतर नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. या कारवाईने ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. धुळे तालुक्यातील बोरी क्षेत्रात नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घालत तब्बल तीन बालकांचा बळी घेतला होता. सोमवारी पहाटेच्या सुमारास या बिबट्याला पकडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अखेर बिबट्या जेरबंद
धुळे तालुक्यातील बोरी परीसरात नरभक्षक बिबट्याने तीन बालकांचे बळी घेतल्यानंतर ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण असताना स्थानिकांकडून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी पुढे आली होती. धुळे वनविभाग आणि पुणे येथील संस्थेच्या पथकाकडून या नरभक्षक बिबट्याला पिंजर्यात कैद करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना सोमवारी पहाटे साडेपाच वाजेला बिबट्याला जेरबंद करण्यात आले. बिबट्या पिंजर्यात कैद झाल्याची माहिती कळताच ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास घेतला.




