भुसावळातील पालिकेच्या जीर्ण इमारतीतील दुकाने पाडण्यास तूर्त ‘स्टे’

खंडपीठात दुकानदारांना तात्पुरता दिलासा : पालिका मांडणार भूमिका


“Stay” to demolish shops in dilapidated municipal building in Bhusawal भुसावळ : भुसावळ पालिकेच्या जीर्ण ईमारतीमुळे निर्माण झालेला धोका पाहता पालिकेने जीर्ण इमारतीत रहिवास करणार्‍या दुकादारांना 48 तासात दुकाने खाली करण्याबाबत नोटीस बजावली होती मात्र या नोटीसविरोधात दुकानदारांनी खंडपीठात धाव घेतल्यानंतर पालिकेच्या कारवाईला तात्पुरता स्टे खंडपीठाने दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पालिका खंडपीठात आता जीर्ण इमारतीबाबत आपली भूमिका मांडणार असून त्यानंतर खंडपीठ काय निर्णय देतो याकडे? शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

जीर्ण इमारतीच प्रश्न ऐरणीवर
शहरात 27 जानेवारी रोजी भूकंपाचा धक्का जाणवल्यानंतर शहरातील जीर्ण इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला तर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीदेखील ही बाब गांभीर्याने दखल घेत पालिका प्रशासनाला कारवाईच्या सूचना केल्या होत्या. पालिकेने सर्व प्रथम आपल्या इमारतीपासून कारवाई करण्याचा निर्णय घेत जीर्ण पालिकेच्या इमारतीत दुकान चालवत असलेल्या 21 दुकानदारांना नोटीसा बजावत 48 तासात दुकाने खाली करण्याच्या सूचना केल्या होत्या मात्र दुकानदार व भोगवटाधारकांनी छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठात याचिका दाखल केल्यानंतर तात्पुरता स्थगिती कारवाईला मिळाली आहे.



कारवाईकडे लागले लक्ष
पालिकेने मरीमाता मंदिर परिसर, विठ्ठल मंदिर, नगरपालिका दवाखान्या मागील भाग, पंजाब नॅशनल बँकजवळील इमारत अशा 5 ते 7 इमारतीचे मालक, भाडेकरु, दुकानदार आदींनाही अंतीम नोटीस दिली आहे. या नोटीसीनंतर अनेकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. शहरातील अनेक जीर्ण इमारतींच्या बाबतीत यापूर्वीच न्यायालयात वादविवाद सुरू आहेत. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयानंतर पालिकेकडून जीर्ण इमारतीसह अतिक्रमण मोहिम राबवण्यात येणार असल्याचे उपमुख्याधिकारी लोकेश ढाके यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !