यावल तालुक्यात अवकाळी पावसामुळे खांडणी केलेल्या कांद्याचे नुकसान

यावल तालुक्यातील रब्बी पिकांना फायदा : पुन्हा पाऊस झाल्यास केळीला फटका


यावल : यावल तालुक्यात रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे फारसे नुकसान झाले नसून रब्बी हंगामातील पिकांना पावसाचा चांगला फायदा होणार आहे मात्र तालुक्यातील पश्चिम भागात खांडणी करून शेतात ठेवलेल्या कांद्याचे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांनी कांदा खांडून ठेवला होता आणि या पावसामुळे तो ओला झाला आहे त्यामुळे कांद्याची प्रतवारी खालावत शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसणार आहे.

कांद्याची प्रतवारी खराब
यावल तालुक्यात रविवारी सायंकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली व रात्री उशिरापर्यंत हळुवार सुरू असलेल्या पावसाने वेग वाढवला. या पावसामुळे तालुक्यातील पिकांचे फारसे नुकसान झालेले नसून उलट रब्बी हंगामातील पिकांना बर्‍यापैकी फायदा झाला आहे. या पावसामुळे यावल तालुक्यातील पश्चिम भागात असलेल्या दहिगाव, सावखेडासीम, कोरपावली, किनगाव, डांभूर्णी, नायगाव, मोहराळा, विरावली, कासारखेडा, आडगाव या गावातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांना फटका बसला आहे. या भागात बर्‍यापैकी कांद्याचे उत्पादन घेतले जाते व अनेक शेतकर्‍यांनी कांदा शेतात खांडणी करून ठेवला होता. या पावसाचा फटका खांडणी केलेल्या कांद्याला बसला आणि मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांचा कांदा हा ओला झाला आहे त्यामुळे शेतकर्‍यांच्या या कांद्याची प्रतवारी खराब होणार आहे. त्यात आर्थिक नुकसान होणार आहे.







केळीला फटका बसण्याची भीती
सोमवारी देखील पावसाचे वातावरण होते म्हणून शेतात असलेला कांदा काही शेतकर्‍यांनी उचल करून आपल्या घरी आणला आहे व काही शेतकर्‍यांनी शेतातच कांदा चांगला ठेवण्यासाठी धावपळ सुरू केलेली दिसत आहे. पुन्हा पाऊस झाला तर मग इतर पिकांसोबत केळी पिकांचे देखील यात मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पावसामुळे केळी पिकाचे काही नुकसान झालेले नसे तरी जर पुन्हा पाऊस आला तर केळीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !