रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य : मध्य रेल्वेचे नूतन महाव्यवस्थापक आर.के.यादव


Safety of railway passengers is priority : New General Manager of Central Railway RK Yadav भुसावळ : मध्य रेल्वेचे नूतन महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी शुक्रवार, 1 रोजी पदभार स्वीकारला. ते 1986 च्या परीक्षा बॅचचे इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इंजिनियर्सचे वरीष्ठ अधिकारी आहेत. मध्य रेल्वे महाव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी ते इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग, पुणे येथे महासंचालक म्हणून कार्यरत होते. पदभार स्वीकारल्यानंतर यादव म्हणाले की, रेल्वे प्रवासात रेल्वे प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची असून त्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. रेल्वेत रेल्वे सुरक्षा यंत्रणांची गस्त वाढवण्यात येणार असून पाच विभागातून धावणार्‍या रेल्वे गाड्या वेळेवर चालवण्यावर व रेल्वेचे उत्पन्न वाढवण्यावर आपले प्राधान्य असेल, असेही ते म्हणाले.

पदभार घेताच विभागप्रमुखांची बैठक
शुक्रवारी पदभार घेताच आर.के.यादव यांनी उपनगरीय लोकल व मेल एक्स्प्रेसच्या मुंबई विभागाच्या ट्रेन ऑपरेशन नियंत्रण कार्यालयाला भेट दिली. मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे, सोलापूर विभागाच्या डीआरएम यांच्या त्यांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे बैठका घेतल्या. मध्य रेल्वेतील नागपूर, भुसावळ, मुंबई, पुणे व सोलापूर या पाच विभागातून धावणार्‍या रेल्वे गाड्या वेळेवर धावण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मध्य रेल्वेतील पाचही विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना सुविधा पुरविल्या जातील, प्रवाशांना सुविधा देण्यासोबतच त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासनाची असल्याने त्याबाबत उपाययोजना केल्या जातील, असेही ते म्हणाले.







भुसावळातील कार्य प्रशंसनीय
आर.के.यादव हे भुसावळ येथे असताना त्यांनी 80 टक्के अतिक्रमण बंदोबस्तात हटवले होते. 15 ते 17 नोव्हेंबर 2018 या कालावधीत भारतीय रेल्वेवरील अतिक्रमण हटवण्याच्या सर्वात मोठ्या मोहिमेत त्यांची प्रमुख भूमिका राहिली होती. मजबूत नेतृत्व आणि कामगिरी उत्कृष्टता प्रदान केल्याबद्दल रेल्वे मंत्र्यांकडून नेतृत्व आणि कार्यप्रदर्शन उत्कृष्टता पुरस्कारानेही त्यांचा गौरव करण्यात आला होता.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !