यावल तहसीलदारांकडून आदिवासी पाड्यांवर नवमतदारांची नोंदणी


Registration of new voters in tribal padas by Yaval Tehsildars यावल : आगामी काळात होवू घातलेल्या विधानसभा व लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नव-मतदारांची नोंदणी सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या वतीने 1 जानेवारी 2024 पर्यंत ज्या तरुण व तरुणींचे 18 वर्ष पूर्ण होणार आहे अशा नागरीकांची नवमतदार नोंदणी मोहिम सुरू आहे. नव मतदार नोंदणीत कुणीही वंचित राहु नये म्हणुन तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी थेट सातपुड्यात जावुन आदिवासी पाड्यावर स्वत:नोंदणी साठी पुढाकार घेतला.

दुर्गम पाड्यावर मतदारांची नोंदणी
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आगामी लोकसभा, विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरीता नव मतदार नोंदणी मोहिम सुरू करण्यात आली आहे. यात यावल तहसील कार्यालयाकडून तालुक्यातील एकही नव मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये म्हणून कंबर कसण्यात आली आहे. नोंदणीसाठी सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम क्षेत्रातील आदिवासी वस्तीवर यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर स्वत:हाच पोहोचल्या व नव मतदारांशी चर्चा करून मतदाना हक्क संर्दभात माहिती देत मार्गदर्शन केले व स्वत:हाच नोंदणी करून घेतली. प्रसंगी त्यांनी आदिवासी समाजाच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तहसीलदारांसह नायब तहसिलदार संतोष विनंते, निवडणूक नायब तहसीलदार रशीद तडवी सह महसूल प्रशासनाच्या वतीने संपूर्ण तालुक्यात विविध गावांमध्ये 1 जानेवारी 2024 पर्यंत 18 वर्ष पूर्ण झालेल्या तरुणी व तरुणांची नव मतदार नोंदणी अभियानास सुरुवात झाली आहे. या मतदार नोंदणी मोहिमेची शेवटची मुदत 9 डिसेंबर 2023 आहे. या मुदतीत 18 वर्ष पुर्ण करणार्‍या तरुणांनी आप आपली मतदार नोंदणी करावी असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे.

दोन दिवस सातपुड्यात मोहिम
यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी 26 आणि 27 रोजी आपल्या महसुलच्या पथकाकडून यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या क्षेत्रातील अतिदुर्गम भागातील जामन्या, गाडर्‍या, उसमळी, लंगडा अंबा येथे नवीन मतदार नोंदणी साठीचे अर्ज भरून घेतले तसेच मयत झालेल्या मतदारांचे नाव कमी करण्याकरिता संबधीत कुटुंबाकडून अर्ज भरून घेतले. यावेळी तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांच्यासोबत तलाठी टी.सी.बारेला आदी उपस्थित होते..


कॉपी करू नका.