भुसावळात 9 डिसेंबरपासून श्री ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन


Shree Dnyaneshwar Mauli Sanjivan Samadhi ceremony organized from December 9 in Bhusawal  भुसावळ : भुसावळ शहरातील कोळी समाज मंगल कार्यालय, गजानन महाराज नगरात 9 ते 11 डिसेंबर 2023 या कालावधीत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या उत्सवाचे 78 वे वर्ष टाहे. श्री ज्ञानेश्वर माऊली सांस्कृतिक व बहुउद्देशीय मंडळ भुसावल विगत 77 वर्षांपासून ही श्रेष्ठ परंपरा जोपासत आहे. 9 ते 11 डिसेंम्बर 2023 या काळात स्वामी स्वरूपानंदद्वारा रचित अभंग ज्ञानेश्वरीचे पारायण होणार आहे. सकाळी आठ ते 12.30 या वेळेत हे सामूहिक पारायण होईल. या उत्सवात दररोज सायंकाळी सात वाजता पुण्यातील स्वामी स्वरूप स्वानंद डॉ.सुधीर पांडे यांची तीन दिवस आध्यात्मिक प्रवचने होणार आहेत. ज्ञानेश्वरीतील मानवी दर्शन, ज्ञानेश्वरीत स्वरूप दर्शन आणि ज्ञानेश्वरीतील विश्वरूप दर्शन असे प्रवचनाचे विषय आहेत. दुपारी विभिन्न भजनी मंडळाचे भजन-गायन होईल.

10 रोजी पुस्तकाचे प्रकाशन
10 डिसेंबरला सायंकाळी सात वाजता रमेशानंद लिखित ‘सोहम पुष्प’या पुस्तकाचे प्रकाशन स्वामी स्वरूप स्वानंद (पुणे) यांच्याहस्ते होईल. याशिवाय दररोज हरिनाम संकीर्तन होईल. सर्व भाविकांनी या सर्व कार्यक्रमांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष भास्कर भोळे, सचिव डॉ. रमेश जोशी, उपाध्यक्ष सुरेश चौधरी, दिलीप झोपे व सर्व सदस्यांनी केले आहे.

11 रोजी काल्याच्या कीर्तनाने समारोप
चिंतामणी गणेश मंडळाचे अथर्वशीर्ष पठण 9 डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता होईल. 11 डिसेंबर रोजी सकाळी समाधिकाळाचे अभंग वाचन, कीर्तन व काला होऊन, दुपारी 12 वाजता महाप्रसाद वितरण होईल. 8 डिसेंम्बरला दुपारी तीन वाजता माऊलींची पालखीचा भव्य सोहळा होणार आहे.


कॉपी करू नका.