रावेरातील सामाजिक स्वास्थ बिघडणार्‍यांवर कठोर कारवाई


रावेर : शहरात शांतता नांदल्यास उद्योग-व्यवसायात भरभराट होते. शहर आणि परीसराच्या प्रगतीसाठी शांतता असणे गरजेचे आहे. शांतता राखण्यासाठी नागरकांनी पोलिसांना सहकार्य करावे. शांतता अबाधित ठेवणे हे समाजाचेही कर्तव्य आहे मात्र काही जण ऐकत नसल्याने परीस्थिती बिघडते. शांततेला बाधा पोहोचणार्‍यांवर पोलिस आगामी काळात हद्दपार व एमपीडीएसारख्या कारवाया करतील, असा इशारा रावेरचे नूतन सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ यांनी येथे दिला. रावेर पोलिस ठाण्यातर्फे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिषकुमार अडसुळ, फौजदार सचिन नवले, दीपाली पाटील, तुषार पाटील उपस्थित होते. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, माजी नगराध्यक्ष हरीष गणवाणी, अशोक शिंदे, कपिल महाराज, गयास शेख यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पद्माकर महाजन, ज्ञानेश्वर महाजन, महेमूद शेख, शैलेंद्र अग्रवाल, दिलीप पाटील, संतोष पाटील, नामदेव महाजन, नितीन पाटील, विजय पाटील, अरुण शिंदे, विजय लोहार, बाळू शिरतुरे, पंकज वाघ, सादीक शेख, युसूफ खान यांच्यासह मोठ्या संख्येने शांतता समिती सदस्य, पोलिस पाटील उपस्थित होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !