यावलला राष्ट्रीय लोकअदालतीत 141 खटल्यांचा निपटारा

दिवाणी, फौजदारी व वित्तीय संस्थांचे 46.63 लक्ष वसुल : वड्री ग्रामपंचायतीचा 16 वर्षांनी खटला निकाली


141 cases disposed of in Yavala National People’s Court यावल : यावल न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. यात दिवाणी, फौजदारी, वित्तीय संस्थासह दाखल होण्यापूर्वीचे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या थकबाकीदारांची एकूण 141 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आले. एकूण 46 लाख 63 हजारांची वसूल झाली. या राष्ट्रीय लोकअदालत वड्री ग्रामपंचायतीच्या शेती संदर्भात गेल्या 16 वर्षांपासून न्यायप्रलंबीत खटलादेखील तडजोडीने निकाली काढण्यात आला.

समजोता झाल्याने दाव्यांचा निपटारा
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधीकरण, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या आदेशान्वये व यावल न्यायालयात शनिवार, 9 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. सकाळी 10 वाजेला तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्या.एस.बी.वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनलप्रमुख सह.दिवाणी न्या.व्ही.एस.डामरे, पॅनल सदस्य अ‍ॅड.निलेश मोरे यांच्या समोर कामकाजाला सुरवात झाली. विविध प्रलंबित दावे यात 278 फौजदारी प्रकरण, 62 दिवाणी प्रकरण अशा एकूण 350 प्रकरणापैकी 39 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला व यातून 14 लाख 02 हजार 228 रुपयांचा दंड वसुल झाला तसेच बँकेची तसेच इतर वित्तीय संस्था व यावल तालुक्यातील ग्राम पंचायर्तीचे, बी.एस.एन.एल, विद्युत वितरण कंपनी आदींच्या दाखलपूर्व तीन हजार 97 प्रकरण या राष्ट्रीय लोक अदालतीसमोर ठेवण्यात आले. यापैकी 102 प्रकरणांवर निपटारा करण्यात आला. यातून तब्बल 32 लाख 61 हजार 606 रुपये वसूल झाले.



140 प्रकरणांचा निपटारा
राष्ट्रीय लोकअदालती समोर एकूण तीन हजार 447 प्रकरणे ठेवण्यात आली. त्यातील 140 प्रकरणांचा निपटारा होवून 46 लाख 63 हजार 834 रूपये वसूल करण्यात आला. गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड, न्यायालयाचे सहायक अधीक्षक बी.के.मोरे, लघूलेखक आर.एस.बडगुजर, लिपिक सी.एम.झोपे, एस.आर.तडवी, कनिष्ठ लिपीक एच.जी.सूर्यवंशी, जी.एस.लाड, एस.जे.ठाकूर, डी.ए.गावंडे, पी.डी.चव्हाण, एस.एस.झांबरे, एम.डी.जोशी, डी.आर.पाटील यांनी परीश्रम घेतले. वकील संघाचे अध्यक्ष, सचिव, अ‍ॅड.सुरळकर, अ‍ॅड.खालीद शेख, अ‍ॅड.गौरव पाटील यांनी परीश्रम घेतले.

16 वर्षांपासून प्रलंबित खटला निकाली.
वड्री ग्रामपंचायतीची शेती (मोटकर्‍या) गट क्रमांक 273 ही इस्माईल तडवी यांच्या ताब्यात होती व त्या शेती संदर्भातील खटला यावल न्यायालयात 1 जानेवारी 2007 रोजी दाखल होता. गेल्या 16 वर्षांपासून प्रलंबीत असलेला खटला सरपंच अजय भालेराव, माजी सरपंच ललित चौधरी, उपसरपंच पंकज चौधरी, ग्रामसेवक मजीत तडवी यांच्या पुढाकाराने व अ‍ॅड.विजय बी.तायडे व अ‍ॅड.अजय कुळकर्णी यांच्या पुढाकाराने या राष्ट्रीय लोक अदालतीत तडजोडीने निकाली काढला व ग्रामपंचायतीच्या ताब्यात ही शेत जमीन अधिकृतरित्या सोपवण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !