पाल वृंदावन धाम आश्रमात 25 रोजी संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी पुण्यतिथी महोत्सव


पाल, ता.रावेर : अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराचे सर्वेसर्वा सद्गुरु परम पूज्य ब्रम्हलीन संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या ब्रम्हलीन समाधीला 14 वर्ष पूर्ण झाल्यामुळे 25 डिसेंबर रोजी 14 व्या पुण्यतिथि महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. त्याच बरोबर पाल वृंदावन धाम आश्रमातील भव्य श्री हरिधाम मंदिराचा वर्धापन दिवस साजरा करण्यात येत आहे. यासाठी आश्रमात तयारीला सुरवात करण्यात आली आहे.

महामंडलेश्वरांची राहणार उपस्थिती
या महोत्सवाला देशभरातील हजारो चैतन्य साधक परिवार तसेच संत महंत महामंडलेश्वर यांचे आगमन होणार आहे. 24 डिसे.ंबर रोजी रात्री 8 ते 10 या वेळेत सत्संग, दीपोत्सव, व भजन संध्या तसेच सकाळी 25 डिसेंबर रोजी 6 वाजेपासून परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापुजी यांच्या समाधी मंदिरात चरण पादुका पूजन, व अभिषेक करण्यात येणार आहे. सकाळी सात वाजेपासुन ध्यान प्रार्थना व 10 वाजेपासून सत्संग श्रद्धावचन व पूज्य बापूजी यांना भावपूर्ण आदरांजलि देऊन महाआरती नंतर महाप्रसाद वितरण करण्यात येईल. येणार्‍या साधक भक्तांसाठी निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, समाधी दर्शन व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, सत्संग पांडाल व्यवस्था, जल व्यवस्था, अश्या विविध व्यवस्था साठी आश्रमातील ब्रम्हचारी व चैतन्य साधक परीवारातर्फे करण्यात येणार आहेत.



गोपाल चैतन्य महाराजांचा सत्संग होणार
महोत्सवात उपस्थित प्रमुख संत-महंत तसेच महामंडलेश्वर यांचे श्रद्धावचन आणि पाल आश्रमाचे वर्तमान पदस्थ व महाराष्ट्र संत समितीचे प्रदेशाध्यक्ष संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज यांच्या सत्संग अमृताचा लाभ भाविक भक्तानां मिळणार आहे. या महोत्सवाला उपस्थितीचे देण्याचे आवाहन आयोजक चैतन्य साधक परिवारातर्फे करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !