जळगावच्या समता नगरातील घरफोडीची उकल : दोघा चोरट्यांना बेड्या


Burglary in Jalgaon’s Samata Nagar solved : Two thieves in chains जळगाव : जळगावातील समता नगरातील घरफोडीची उकल करण्यात रामानंद पोलिसांना यश आले आहे. प्रकाश श्रावण सुरवाडे (18) व दीपक सुभाष भांडारकर (21, दोन्ही रा.समतानगर, जळगाव) या संशयितांना अवघ्या तीन तासात रामानंद नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

रामानंद नगर पोलिसात दाखल होता गुन्हा
जळगाव शहरातील समता नगरमधील रहिवासी प्रतिभा चंद्रकांत बनसोडे (वय 40) या शनिवारी कामानिमित्त घर बंद करून बाहेर गेल्या असता घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी साधली. घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेले रोख 71 हजार रुपये व 10 हजार रुपये किंमतीच्या चांदीच्या पट्ट्या असा एकूण 81 हजारांचा मुद्देमाल लांबवण्यात आला. काम आटोपल्यानंतर बनसोडे या घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.



गोपनीय माहितीवरून आरोपी जाळ्यात
या घरफोडीसंदर्भात प्रभारी अधिकारी विठ्ठल पाटील यांनी चक्रे फिरविली. त्यांच्यासह गुन्हे शोध पथकातील पोलिस नाईक रेवानंद साळुंखे, रवींद्र चौधरी यांनी अवघ्या तीन तासात संशयित प्रकाश सुरवाडे व दीपक भांडारकर यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरलेली काही रक्कम हस्तगत करण्यात आली. तपास हवालदार संजय सपकाळे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !