पतीसह मुलाला ठार मारण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार : अंघोळीचा व्हिडिओ व्हायरलचीही धमकी


Threatening to kill husband and child, rape of married woman : Bathing video also threatens to go viral धरणगाव : पतीसह मुलाला ठार मारण्याची धमक देत तसेच विवाहितेचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर तरुणाने अत्याचार केला. ही घटना धरणगाव तालुक्यातील एका गावात जून 2023 ते डिसेंबर 2023 दरम्यान घडली. याप्रकरणी संशयित भूषण सुकलाल महाजन (धरणगाव तालुका) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

व्हिडिओ व्हायरलची धमकी
धरणगाव तालुक्यातील एका गावातील 26 वर्षीय विवाहितेचा संशयित भूषण नामक तरुणाने अंघोळ करतानाचा व्हिडीओ तयार केला होते. त्यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तसेच पीडीतेच्या मुलाला उचलून नेण्याची व पतीला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर जून 2023 ते 16 डिसेंबर या काळात 3 ते 4 वेळा अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी पीडीतेच्या फिर्यादीवरून बलात्कारासह विविध कलमान्वये धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष पवार करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !