चाळीसगाव तालुक्यात किरकोळ वादातून प्रौढाचा खून : आठ जणांविरोधात गुन्हा


Murder of an adult due to petty dispute in Chalisgaon taluka : Crime against eight persons चाळीसगाव : गटारीची स्वच्छता केल्याच्या वादातून वाद उफाळल्यानंतर प्रौढाचा धारदार हत्यारांनी वार करीत तसेच मारहाण करीत खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यातील सुंदरनगर तांडा क्रमांक एक येथे सोमवार, 8 रोजी सकाळी नऊ वाजता घडली. या घटनेत पंडित भारमल मोरे असे (55, सुंदरनगर तांडा क्रमांक एक, ता.चाळीसगाव) यांचा मृत्यू ओढवला. याप्रकरणी आठ संशयितांविरोधात मेहुणबारे पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

किरकोळ वाद बेतला जीवावर
चाळीसगाव तालुक्यातील सुंदरनगर तांडा क्रं. 1 येथील रहिवासी व तक्रारदार खंडू पंडीत मोरे (29) यांच्या घरासमोर असलेल्या नालीच्या पाण्याची सफाई त्यांच्या आईने केली होती. त्याचा राग आल्याने संशयित दीपक भावसिंग माळी व अशोक भावसिंग माळी या दोघा भावांनी खंडू मोरे यांना शिवीगाळ केली. आपल्याला शिवीगाळ का केली याचा जाब विचारण्यासाठी खंडू मोरे हे दीपक माळी याचे काका उत्तम लाला माळी यांच्याकडे गेले.



खंडू मोरे आणि लाला माळी हे दोघे आपसात बोलत असतांना संशयित दीपक भावसिंग माळी, अशोक भावसिंग माळी, श्रीकांत माळी, प्रल्हाद, आदित्य माळी, दिपकचा भाचा असे सर्वजण खंडू मोरे यांच्या अंगावर धावून आले. सर्वांनी मिळून खंडू मोरे यांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली.

खंडू मोरे यांना होत असलेली मारहाण बघून त्यांची आई, बहिण आणि वडील पंडीत मोरे असे तिघेजण वाद सोडवण्यास आले. दीपक भावसिंग माळी व अशोक भावसिंग माळी या दोघा भावांनी त्यांच्या हातातील लाकडी दांडक्याने पंडीत मोरे यांना मारहाण सुरू केली. त्यात ते गंभीर जखमी झाले. पंडीत मोरे यांना होणारी मारहाण बघून खंडू मोरे यांची बहिण भांडण सोडवण्यास आली. त्यावेळी लक्ष्मीबाई माळी व सिीमा बागुल या दोघींनी खंडू मोरे यांच्या बहिणीला पकडून ठेवत धक्काबुक्की व शिवीगाळ केली. या घटनेदरम्यान कुणीतरी धारदार शस्त्राने पंडीत मोरे आणि खंडू मोरे यांच्या बहिणीच्या पाठीवर वार केले. त्यात पंडीत मोरे वैद्यकीय उपचारादरम्यान मृत्यू झाला. तपास सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !