एरंडोलला भरधाव ट्रकच्या धडकेने तरुणाचा मृत्यू : नागरीकांनी महामार्ग रोखला
A young man dies after being hit by a speeding truck at Erandol: Citizens block the highway एरंडोल : पारोळ्याकडून भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रकने उडवल्याने तरुणाचा मृत्यू तर चौघे जखमी झाल्यानंतर संतप्त शहरवासीयांनी महामार्गावर रास्ता रोको केला तर रास्तादेखील जेसीबीद्वारे खोदण्यात आल्यानंतर रात्री वाहतूक ठप्प झाली होती.
धरणगावात तरुणाचा मृत्यू
सूत्रांच्या माहितीनुसार, पारोळा शहराकडून येणार्या ट्रकने रस्ता ओलांडणार्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकीला धडक दिली. या अपघातात जितेंद्र भालेराव वय (30, धरणगाव) या तरुणाचा मृत्यू झाला तर धनंजय साठे (40), शाहरूख पठाण (28), बाळू पवार (24) व कैलास पवार (25) हे जखमी झाले. हा अपघात एरंडोल शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील अमळनेर नाक्यानजीक बुधवार, 10 जानेवारी रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास घडला.


नागरीकांनी महामार्ग रोखला
यावेळी संतप्त जमावाने हजारोंच्या संख्येने महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. हे आंदोलन जवळपास दहा वाजेनंतरही सुरू होते. काही नागरीकांनी जेसीबी आणून रस्ते महामार्ग क्रमांक सहावर खोल चारी खोदली. या आंदोलनामुळे महामार्गाच्या सहा ते सात किलोमीटर पर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिणामी महामार्गावरील वाहतुकीची कोंडी झाली.
ट्रक (एम.एच.48 ए.टी. 7682) ने पारोळा शहराकडून येत असताना दुचाकी (एम.एच.19 बी.के.0442) या क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकी चालक जितेंद्र भालेराव (30, धरणगाव) हा जागीच ठार झाला तर अन्य तिघे जखमी झाले.
पोलिसांनी केले शांततेचे आवाहन
एरंडोल पोलिस निरीक्षक सतीश बोराडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे, पोलिस उपनिरीक्षक शरद बागल व त्यांच्या सहकार्यांनी परीस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.
