जळगावातील शिक्षिकेच्या घरातून साडेतीन लाखांचा ऐवज लांबवला
A compensation of three and a half lakhs was extended from the house of a teacher in Jalgaon जळगाव : शहरात चोर्या-घरफोड्यांचे सत्र थाांबयला तयार नाही. शिक्षिकेच्या घरातून चोरट्यांनी तब्बल साडेतीन लाखांचे दागिणे लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. रामानंद नगर पोलिसात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोलकरणीवर संशय : पोलिसांकडून तपासाला वेग
आदर्श नगरातील तन्मय अपार्टमेंटमध्ये अर्चना ढुमे वास्तव्यास असून त्या खाजगी शाळेत शिक्षिका आहेत. या एका विवाह सोहळ्यानिमित्त त्या परगावी गेल्यानंतर या कालावधीत शेजार्याकडे ठेवण्यात आलेली घराची चावी मोलकरणी घेत असे. घरातील कामकाज आटोपल्यानंतर मोलकरीण घराला कुलूप लावून ती चावी पुन्हा शेजार्याकडे ठेवत असे मात्र विवाह सोहळा आटोपल्यानंतर घरी आल्यानंतर फ्रिजच्या फ्रिजरमधील दागिने गायब झाल्याचे आढळून आले.


75 हजारांचे कानातील जोड, 75 हजार रुपये किंमतीचा लक्ष्मीहार, 90 हजारांची सोन्याची पोत, 15 हजारांची सोन्याची अंगठी, 30 हजारांचे सोन्याचे पेंडल, 60 हजार रुपये किंमतीची सोन्याची पाटली मिळून एकूण तीन लाख 45 हजारांचे दागिने लांबवण्यात आले. दरम्यान, घरातील मोलकरणीवर संशय व्यक्त करण्यात आला असून या अनुषंगाने पोलिसांकडून तपास केला जात आहे. तपास सहाय्यक निरीक्षक रोहिदास गभाले करीत आहेत.
