सातोद गावातील युवक दुचाकी अपघातात ठार
Youth of Satod village killed in two-wheeler accident यावल : यावल तालुक्यातील सातोद गावातील रहिवासी 26 वर्षीय तरुणाचा छत्रपती संभाजी नगर-पुणे रस्त्यावर दुचाकी अपघातात मृत्यू झाला. कुटुंबातील एकुलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्यूमुळे गावातून हळहळ व्यक्त करण्यात आली. जयराज प्रशांत महाजन (26) असे मयत तरुणाचे नाव आहे.
दुचाकी अपघातात मृत्यू
जयराज हा युवक पुणे येथे ग्राफिक्स डिझायनर म्हणून आयटी क्षेत्रात कार्यरत होता. कामानिमित्त तो छत्रपती संभाजीनगर येथे आला होता व 16 जानेवारी रोजी तो दुचाकीद्वारे पुणे येथे जाण्यासाठी निघाल्यानंतर दुचाकीचा छत्रपती संभाजी नगराच्या बाहेर पुणे रस्त्यावर अपघात झाला व यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर छत्रपती संभाजी नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवार, 21 जानेवारी रोजी पहाटे पूर्वी त्याचा मृत्यू झाला. एकूलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्यूमुळे यावल तालुक्यातून हळहळ व्यक्त करण्यात आली. जयपाल हा सातोद येथील प्रशांत दिनकर महाजन यांचा मुलगा होय. त्याच्यावर सातोद येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.


