भीषण अपघातात सहा जण जागीच ठार : तिघे जखमी


Six people died on the spot in the horrific accident: three were injured अहमदनगर : एसटी बस, इको व्हॅन व ट्रॅक्टरमध्ये झालेल्या विचित्र अपघातातात सहा नागरीकांचा मृत्यू ओढवला तर तिघे जखमी झाले. कल्याण महामार्गावरील ढवळपुरी फाट्यालगत बुधवारी पहाटे तीन वाजता हा अपघात घडला. निलेश रावसाहेब भोर, प्रकाश रावसाहेब थोरात, अशोक चिमा केदार, जयवंत रामभाऊ पारधी, संतोष लक्ष्मण पारधी, सचिन कांतीलाल मंडलीचा अशी या अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत.

भल्या पहाटे भीषण अपघात
ठाणे-मेहकर एसटी बस, उसाचा ट्रॅक्टर व इको गाडीची ढवळपुरी फाट्यालगतच्या हिवरे कोरडा शिवारात धडक झाली. त्यात सहा नागरीक झाले. मृतांपैकी 5 जणांचा मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयात, तर एकाचा अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मृतांपैकी 2 जण पारनेर, तर 3 जण संगमनेर, तर अन्य 1 जण पाथर्डी तालुक्यातील आहे. या घटनेत 1 स्थानिक तरुण घटनास्थळी मदत करताना जखमी झाला आहे.



अचानक पाठीमागून धडकली बस
हिवरे कोरडा शिवारात पहाटे 3 च्या सुमारास एसटी बस ठाण्याहून नगरला येत होती. रस्त्यात उसाची ट्रॉली पलटी होऊन ऊस रस्त्यावर पसरला होता. या उलटलेल्या ट्रॉलीला दुसरा एक ट्रॅक्टर जोडून हलवण्यात येत होते. यावेळी काही मजूर ऊस उचलण्याचे काम करत होते. हे पाहून इको कार चालक थांबून पार्किंग लाईट लावून रोडवरील वाहनांना दिशा देत होता. त्यावेळी एसटी बसने अचानक ट्रक्टर व ईको व्हॅनला धडक दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !