बोदवड शहरात धाडसी घरफोडी : सव्वाचार लाखांचा ऐवज लंपास
Daring house burglary in Bodwad city : Swavafour lakhs instead of loot बोदवड : शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडीचे प्रकार वाढल्याने नागरीक धास्तावले आहेत. बोदवड शहरातील जामठी दरवाजा भागातील प्रभाग क्रमांक नऊमध्ये भरदिवसा घरफोडी करीत तब्बल सव्वा लाखांचा ऐवज लांबवण्यात आल्याने खळबळ उडाली. ही चोरी गुरुवार, 25 रोजी सकाळी 10.30 ते 11.30 दरम्यान घडली.
भरदिवसा चोरीने खळबळ
शहरातील जामठी दरवाजा भागात रामधन नामदेव चापोरकर (45) हे शेतकरी कुटूंबासह वास्तव्यास आहेत. गुरुवार, 25 रोजी सकाळी 10.30 ते 11.30 दरम्यान कुणीतरी चापोरकर यांच्या घरात भर दिवसा प्रवेश करीत घरातील लाकडी पेटीतील चार लाखांची रोकड तसेच 14 हजार रुपये किंमतीच्या तीन ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बाह्या असा एकूण चार लाख 14 हजार रुपयांचा ऐवज लांबवला.


चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर चापोरकर यांना बोदवड पोलिसांना माहिती दिली. जळगाव येथून श्वान पथकाला पाचारण करण्यात आल्याने श्वानाने जामठी रोड पर्यंतचा रस्ता दाखवला व श्वान घुटमळले. बोदवड पोलिस स्टेशनमध्ये चापोरकर यांनी फिर्याद दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार विनोद श्रीनाथ करीत आहे.
