कुर्हा येथे रोडरोंमियोंचा उच्छाद : पोलिस प्रशासनाला बंदोबस्तासाठी साकडे
Roadrunners rise in Kurha: Police administration asked for settlement मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा येथे शाळकरी महाविद्यालयीन विद्यार्थिनी रोडरोमिओंमुळे त्रस्त झाल्या असून विद्यार्थिनींचे या प्रकारामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. पोलिस प्रशासनाने तातडीने या संदर्भात पावले उचलावीत, अशी मागणी पोलिस प्रशासनाला निवेदन देवून करण्यात आली.
छेडखानीनंतर आत्महत्येचा प्रयत्न
सोमवार, 29 रोजी कला व वाणिज्य विद्यालय परीसरात एका विद्यालयीन मुलाने एका विद्यालयीन मुलीची छेड काढली व त्यानंतर युवकानेच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार कुर्हा येथे कला व वाणिज्य विद्यालय परिसरात घडला होता. शाळा-कॉलेज सुरू होण्याच्या व सुटण्याच्या वेळेवर रोड रोमियो मोटरसायकली घेवून सुसाट वेगाने जाऊन काही मुलींचा पाठलाग करतात किंवा छेड काढतात. गेल्या अनेक दिवसांपासून परीसरात हा प्रकार सुरू आहे. शाळा व विद्यालयीन प्राचार्य शिक्षक किंवा संस्थेचे पदाधिकारी याकडे लक्ष देत नसल्याने असे प्रकार नेहमीच घडत आहेत.


महाविद्यालय परीसरात हवेत सीसीटीव्ही
रोडरोमिओंवर वचक बसण्यासाठी कुर्हा येथील सामजिक संघटना, विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून पोलिस दूरक्षेत्र कुर्हा, कला व वाणिज्य विद्यालय कुर्हा व शिवाजी हायस्कूल, कुर्हा यांना निवेदन देण्यात आले. ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांना सुद्धा निवेदन देत मुख्य चौक ते शाळा व विद्यालय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची मागणी करण्यात आली.
निवेदन देताना यांची होती उपस्थिती
निवेदन देताना बजरंग दल मुक्ताईनगर संयोजक भोला खिरळकर, राष्ट्रवादी सोशल मीडिया तालुकाध्यक्ष मयुर साठे, ग्रामपंचायत सदस्य युवराज माहुरकर, राहुल खिरळकर, अविनाश वाढे, रीतेश मुळतकर, अमोल देशमुख, रणजीत गोयंनका, भाजपा शहराध्यक्ष प्रवीण शिंपी, नितीन सोंडे, शेख अशपाक, विकास कांडेलकर, भैय्या कांडेलकर, गणेश भोई, रामेश्वर ढोले, जावेद खान, अक्षय गंगतीरे, प्रतीक गोयंनका आदी उपस्थित होते.
