संदीप रणदिवे भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे नूतन पोलिस निरीक्षक


Sandeep Ranadive New Police Inspector of Bhusawal City Police Station भुसावळ  : भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजानन पडघण यांची बााजारपेठ पोलिस ठाण्याच्या निरीक्षकपदी बदली झाल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात प्रभारी अधिकारीपदी रामानंद निरीक्षक संदीप पोपट रणदिवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी मंगळवारी सायंकाळी काढले.

आज पदभार स्वीकारणार
अलीकडेच जिल्ह्यातील सात पोलिस निरीक्षकांच्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बदल्या करण्यात आल्या होत्या. बाजारपेठ निरीक्षक बबन आव्हाड यांची एमआयडीसीत बदली झाल्यानंतर शहरचे निरीक्षक गजानन पडघण यांची बाजारपेठला वर्णी लागली तर शहर पोलिस ठाण्यात कुणाची नियुक्ती होणार? याकडे लक्ष लागले होते. मंगळवारी सायंकाळी जिल्हा पोलिस अधीक्षक रामानंदचे संदीप रणदिवे यांची शहर पोलिस ठाण्यात नियुक्ती केली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !