नाशिक परीक्षेत्राच्या विशेष महानिरीक्षकपदी दत्तात्रय कराळे


Dattatraya Karale as Special Inspector General of Nashik Examination
नाशिक :
नाशिक परीक्षेत्राच्या विशेष महानिरीक्षकपदी ठाणे शहर सह पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांची बदली करण्यात आली आहे. विशेष महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर यांच्या बदलीचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.

नाशिक परीक्षेत्राच्या महानिरीक्षक दत्तात्रय कराळे
नाशिक परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर यांच्या जागी जळगावचे तत्कालीन पोलिस अधीक्षक व ठाणे शहर सह पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांची बदली करण्यात आली आहे.

महेश्वर रेड्डी जळगावचे नूतन पोलिस अधीक्षक
जळगावचे पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांची सोलापूर शहर पोलिस आयुक्तीपदी पदोन्नतीवर बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी बृहन्मुंबई पोलिस उपायुक्त एमसीव्ही महेश्वर रेड्डी बदलून येत आहेत. राज्य शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी बुधवारी सायंकाळी भारतीय व राज्य पोलिस सेवेतील अनेक अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात जळगावचे पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांचीही बदली झाली आहे.

मोक्कासह हद्दपारीच्या सर्वाधिक कारवाया
20 ऑक्टोबर 2022 रोजी जळगाव पोलिस दलात एम.राजकुमार यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात सर्वाधिक मोक्कासह हद्दपारीच्या कारवाया करण्यात आल्या. अत्यंत शिस्तबद्ध अधिकारी म्हणून एम.राजकुमार यांनी काम पाहिले. पोलिस दलातील कसूर करणारे अधिकारी असो की कर्मचारी त्यांनी कुठल्याही दबावाविना कठोर कारवाई करीत आपल्या कार्याचा ठसा उमटवला. अत्यंत शिस्तबद्ध अधिकार्‍यांच्या बदलीनंतर पोलिस कर्मचार्‍यांना मोठा धक्का बसला आहे.

चाळीसगाव अपर अधीक्षकपदी कविता नेरकर
चाळीसगावचे अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांची पुणे ग्रामीण अपर पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी महाराष्ट्र राज्य मुंबई सायबर सेलच्या कविता नेरकर बदलून येत आहेत.


कॉपी करू नका.