भुसावळातील तापी पात्रात अनोळखीचा मृतदेह आढळला
The body of an unknown person was found in a tapi vessel in Bhusawal भुसावळ : शहरातील तापी नदीच्या पात्रात अनोळखी अंदाजे 35 ते 40 वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला असून याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हा प्रकार बुधवार, 31 जानेवारी रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
शहराजवळील तापी नदीच्या पात्रात बुधवार, 31 जानेवारी रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास तापी नदीच्या पात्रात अनोळखी 35 वर्षीय तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती नागरीकांनी शहर पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये मृतदेह हलवण्यात आला असून अनोळखीची ओळख पटविण्याचे आवाहन भुसावळ शहर पोलिसांनी केले आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक संजय कंखरे करीत आहेत.


