पिंप्रीसेकमला महसूल पथकाकडून वाळू वाहतूकीचे ट्रॅक्टर जप्त
Pimprisekum revenue team seizes tractor for transporting sand भुसावळ : भुसावळ तालुक्यातील पिंप्रीसेकम शिवारातील तापी नदीच्या पात्रात अवैधरीत्या वाळूचे उत्खनन करतांना महसूल विभागाच्या पथकाने एक ट्रॅक्टर जप्त केले मात्र महसूल कर्मचार्यांवर दादागिरी करीत जमाव जमला व पोलिसांना पाचारण करताच जमाव पांगला. महसूल विभागाने ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा केले आहे. ही प्रकार गुरुवार, 1 फेब्रुवारी संध्याकाळी सात वाजता घडला.
कारवाईने उडाली खळबळ
परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी अर्पित चव्हाण, तहसीलदार नीता लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंप्रीसेकम शिवारातील तापी नदीपात्रातून अवैधरीत्या वाळूचे उत्खनन करून वाहतूक केली असताना महसूल विभागाचे मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवाल यांच्या संयुक्त पथकाने किरण संतोष सूर्यवंशी (रा.रामपेठ वरणगाव) यांचे मालकीचे ट्रॅक्टर हे पिंप्रीसेकम-फुलगावच्या शेतरस्त्यावर अवैधरित्या वाळू वाहतूक करताना पकडले. ट्रॅक्टर हे तहसील कार्यालयात लावण्याबाबत चालकास पथकातील कर्मचार्यांनी सूचना दिल्यावरही तो नेत नव्हता, यावेळी अवैधरित्या वाळू वाहतूक करणार्या 25 ते 30 जणांचा जमाव जमला. यावेळी कर्मचार्यांनी तहसीलदार निता लबडे यांना माहिती दिल्यावरून त्यांनी तत्काळ भुसावळ तालुका पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना पाहता जमाव व चालक सुध्दा पसार झाला. यामुळे महसूल कर्मचार्यांनी अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालवत तहसील कार्यालयात जमा केले. मंडळाधिकारी प्रवीण पाटील, रजनी तायडे, फिरोज खान, तलाठी मिलिंद तायडे, नितीन केले आदींच्या पथकाने केली.


