जळगावात महाविद्यालयीन विद्यार्थिनीची ट्रॉली बॅग चोरट्याने लांबविली
A college student’s trolley bag was stolen by a thief in Jalgaon जळगाव : महाविद्यालयीन विद्यार्थिनीची ट्रॉली बॅग चोरट्याने ख्वाजानगर मस्जिदजवळून लंपास केली. गुरुवार, 8 रोजी घटना घडली. बॅगमध्ये दहा हजारांची रोकड, आधार कार्ड, पोस्टाचे स्मार्ट कार्ड, बँक पासबुक असे कागदपत्रे होती. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
विद्यार्थिनी मूळ चंद्रपूर येथील असून शिक्षण घेत आहे. नशिराबाद येथे ती आली असता तिची ट्रॉलीबॅग चोरट्याने लांबविली. तपास एएसआय हरेश पाटील करत आहेत.


