चोरीच्या आठ मोबाईलसह खंडव्यातील अट्टल चोरटा भुसावळ जीआरपीच्या जाळ्यात


A staunch thief from Khandwa with eight stolen mobile phones in the net of Bhusawal GRP भुसावळ : गोवा एक्स्प्रेसमधील झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल लांबवणार्‍या खंडव्यातील कुविख्यात चोरट्याच्या भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे मुसक्या बांधल्या आहेत. चोरट्याच्या अटकेनंतर अन्य दोन गुन्हे उघडकीस आले असून आरोपीच्या ताब्यातून चोरीचे तब्बल आठ मोबाईल जप्त करण्यात आले. आशू संदीप साहू (22, खंडवा, मध्यप्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

चोरी प्रकरणी कारवाई
अप गोवा 12780 एक्स्प्रेसमधून शुभम शर्मा हे कोच क्रमांक ए- 1, बर्थ क्रमांक 17 वरून ग्लीलीयर ते पुणे असा प्रवास 31 जानेवारी 2023 रोजी करीत होते. भुसावळ रेल्वे स्थानक आल्यानंतर शर्मा हे झोपी गेल्याने ही संधी चोरट्यांनी साधून त्यांचा 27 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला होता. याप्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेटच्या आधारे संशयित आशू साहू यास निष्पन्न करीत त्यास बेड्या ठोकल्या. आरोपीकडून तब्बल एक लाख 50 हजार 999 रुपये किंमतीचे आठ मोबाईल जप्त करण्यात आले. शर्मा यांचा मोबाईल जप्त केल्यानंतर अन्य दोन मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून उर्वरीत पाच मोबाईलही चोरीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.



यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील व रेल्वे सुरक्षा बल आयुक्त एच.श्रीनिवासराव, पोलिस उपनिरीक्षक मारोती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ लोहमार्ग पोलिस निरीक्षक विजय घेरडे, रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक आर.के.मीना यांच्या नेतृत्वात हवालदार जगदीश ठाकूर, दिवाणसिंग राजपूत, धनराज लुले, विशाल चौधरी, बाबू मिर्झा, रेल्वे सुरक्षा बलाचे आरक्षक महेंद्र कुशवाह, इम्रान खान आदींनी केली. तपास हवालदार सुधीर पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !